सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी चार महिला उमेदवार इच्छुक
सावंतवाडीत भाजपच्या पत्रकार परिषदेत माहिती
सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी शहरात नगरपालिका निवडणुकीसाठी आमच्याकडे वीसही उमेदवार तयार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी चार महिला उमेदवार इच्छुक आहेत. युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले या नगराध्यक्ष पदासाठी चांगल्या उमेदवार आहेत. आम्ही स्वबळाची तयारी केली आहे. मात्र पक्षश्रेष्ठी काय तो निर्णय घेतील असे भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर ,युवराज लखम सावंत भोसले, मनोज नाईक यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पालकमंत्री नितेश राणे व प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून दोन कोटी रुपयांची विकास कामे शहरात प्रगतीपथावर आहेत . अजून एक कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले . यावेळी श्री नाईक म्हणाले सावंतवाडी शहरात विकास कामे भाजपच्या माध्यमातून होत आहेत. महायुतीच्या माध्यमातून कामे केली जात आहेत असे ते म्हणाले.