सुरपूर तालुक्यात शेततळ्यात बुडून चार मुलांचा मृत्यू
10:42 AM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : पोहायला गेलेल्या चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. यादगिरी जिल्ह्याच्या सुरपूर तालुक्यातील नगनूर गावात रविवारी ही दुर्दैवी घटना घडली. किरण (वय 6), बसम्मा (वय 11), शरत (वय 6) आणि हनुमेश (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, शाळेला सुटी असल्याने चारही मुले शेततळ्यात पोहण्यासाठी गेले होते. दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. मुलांना गमाविल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे. याची माहिती मिळताच केंभावी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेची नोंद केंभावी पोलीस स्थानकात झाली आहे.
Advertisement
Advertisement