For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळुरात चार बांगलादेशींना अटक

07:00 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळुरात चार बांगलादेशींना अटक
Advertisement

बेंगळूर : शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सुद्दगुंटेपाळ्या येथे सीसीबी पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली. शमीम अहमद, मोहम्मद अब्दुल्ला, नूरजहाँ आणि हरून मोहम्मद अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. एका महिलेसह तिघांनी बनावट कागदपत्रे तयार करून भारतीय पासपोर्ट मिळविला होता. याबाबत खात्रीशीर माहिती मिळताच  आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. छाप्यात आरोपींकडून आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आयुष्मान कार्ड, मजदूर कार्ड आणि मतदार ओळखपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. बांगलादेशातून अवैधरित्या आलेले शमीम अहमद, मोहम्मद अब्दुल्ला, नूरजहाँ आणि हरून मोहम्मद हे बन्नेरघट्टा रोडवरील बिस्मिला नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. जमील नावाच्या घरात तो भाड्याने राहत होता. त्यांनी बनावट भाडेपत्र आणि रहिवासाचा पुरावाही तयार केला होता. त्याद्वारे त्यांच्याकडे आधारकार्ड, पॅन कार्ड, रेशनकार्डही होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.