For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘मत्स्यगंधा’मधून 50 लाखांच्या दागिन्यांसह चारजणांना अटक

02:45 PM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
‘मत्स्यगंधा’मधून 50 लाखांच्या दागिन्यांसह चारजणांना अटक
Advertisement

मडगाव रेल्वे सुरक्षा दलाची यशस्वी कामगिरी : प्रवाशांचे साहित्य चोरणारी टोळी हरियाणातील

Advertisement

मडगाव : रेल्वेतून प्रवाशाचे साहित्य चोरणाऱ्या हरियाणातील ‘सहाशी गँग’ मधील चार सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात मडगाव रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे सुमारे 50 लाख रूपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रू. 34,500 जप्त करण्यात आले आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मडगाव रेल्वे सुरक्षा दलाने ही कारवाई केली. हे चारही सराईत गुन्हेगार मत्स्यगंधा रेल्वेतून प्रवाशांचे सामान चोरून सुरतकल (कर्नाटक) येथून मडगाव रेल्वे स्थानकावर उतरणार असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी जवानांची पथके तयार केली. संशयितांपैकी तिघेजण रेल्वे गार्डच्या मागील जनरल डब्यातून प्रवास करत होते. रेल्वे मडगाव स्थानकावर येताच पुढील डब्यातील एका संशयिताने धावत्या गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

मोठा मुद्देमाल जप्त

Advertisement

पोलिसांनी संशयितांकडून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यात बारा बांगड्या, चार हार, दोन नेकलेस, एक मंगळसूत्र, चार सोनसाखळ्या, एक मोत्याची माळ, सहा कानातले रिंग, चार अंगठ्या असे एकूण 50 लाख रूपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख 34,500 चा समावेश आहे. पोलिसांनी संशयित दिलबाग रिसाल सिंग (42), राजेश लिलू राम (42), मनोज कुमार सिंग आणि जितेंद्र सिंग (45) या सराईत गुन्हेगारांचा अटक केली. हे सर्वजण हरियाणातील सहाशी गावामधील असल्याची माहिती रेल्वे सुरक्षा पोलिसांनी दिली.

Advertisement
Tags :

.