कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अपहरणप्रकरणी चौघांना अटक

11:26 AM Sep 25, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

रत्नागिरी :

Advertisement

देवरुख येथील सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी बदलापूर येथे चौघा संशयितांना अटक केल़ी यातील दोघे बदलापूर येथील तर अन्य दोघे संगमेश्वरमधील रहिवासी आहेत़ संशयितांकडून पोलिसांनी चारचाकीसह 6 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आह़े संशयितांना बुधवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिल़ी.

Advertisement

देवरुखमधील सोने व्यापारी धनंजय गोपाळ केतकर (63, ऱा मार्लेश्वर फाटा देवरुख त़ा संगमेश्वर) हे 17 सप्टेंबर रोजी आपल्या चारचाकी वाहनातून घरी जात होत़े रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास साखरपा देवरुख रस्त्यावरील वांझोळे गावी संशयितांनी त्यांची गाडी अडविल़ी तसेच केतकर यांना संशयितांनी जबरदस्तीने आपल्या गाडीमध्ये बसविल़े.

यावेळी केतकर यांच्याकडील 16 लाख रुपये किमतीच्या 3 सोनसाखळ्या, खिशातील 20 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतले.

काही अंतर पार केल्यानंतर संशयितांनी केतकर यांना दुसऱ्या कारमध्ये बसविल़े यावेळी संशयितांनी ‘तुला सोडायचे असल्यास किती पैसे देणार व कुठे आणून देणार’ अशी विचारणा केल़ी यानंतर संशयितांनी केतकर यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी करत डोक्यामध्ये मारुन दरीत टाकून देऊ अशी धमकी दिल़ी दरम्यान, संशयितांनी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास केतकर यांना वाटूळ गावी सोडून दिले होत़े अपहरणाच्या घटनेने घाबरलेल्या केतकर यांनी देवरुख पोलीस ठाण्यात 10 संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केल़ी

पोलिसांनी याप्रकरणी संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 309(4), 310, 311, 142(2), 127(2), 115(2), 351(2) नुसार गुन्हा दाखल केल़ा या प्रकरणाचा तपास देवरुख पोलिसांबरोबरच स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून करण्यात येत होत़ा तपासादरम्यान संशयित हे बदलापूर येथील असल्याचे निष्पन्न झाल़े त्यानुसार पोलिसांनी चौघा संशयितांच्या मुसक्या आवळल्य़ा

या गुह्यामध्ये आणखी काही संशयित पसार असून त्याचा देखील शोध पोलिसांकडून घेतला जात आह़े
संशयिताना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, देवऊख पोलीस निरीक्षक उदय झावरे, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, प्रशांत बोरकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग गोरे, सुभाष भागणे, हवालदार नितीन ढोमणे, शांताराम झोरे, विनायक राजवैद्य, वाळू पालकर, विक्रम पाटील, विजय आंबेकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, योगेश नार्वेकर, दीपराज पाटील, प्रवीण खांबे, अमित कदम, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, योगेश शेट्यो, विनोद कदम, रमिज शेख, कॉन्स्टेबल नीलेश शेलार, शितल पिंजरे, पोलीस शिपाई चालक अतुल कांबळे, दत्ता कांबळे आदींनी महत्वाची कामगिरी पार पाडल़ी

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article