कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli Crime : जत-वळसंग रोडवर गुंगीचे औषध लावून 35 हजाराची रोकड लंपास;

04:01 PM Dec 10, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                             जत जवळील नायरा पेट्रोल पंपाजवळ गुंगी लुटारूंचा धक्का

Advertisement

जत : जत-वळसंग रोडवर शहरापासून जवळच नायरा पेट्रोल पंपाजवळ तिकोंडी करेवाडी येथील दोघे मोटारसायकलने जतकडे येत असताना मोटारसायकल अडवून दोघांच्या तोंडाला गुंगीचे औषध लावून त्यांच्या जवळील रोख ३५ हजाराची रोकड लंपास केल्याची घटना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

Advertisement

भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती अशी तिकोंडी करेवाडी येथील ४० वर्षीय सुखदेव बंडू करे हे मंगळवारी दुपारी गावातीलच ५५ वर्षीय शंभू खराडे यांना सोबत घेवून वळसंगमार्गे जतला निघाले होते.

दुपारी दोनच्या सुमारास वळसंग व जतमध्ये नायरा पंपाजवळ चौघांनी सुखदेव करे यांची मोटारसायकल थांबवली. या चौघांनी सुखदेव करे व त्यांच्यासोबत असलेल्या शंभू खराडे यांना बोलण्याच्या नादात गुंतवले व त्याचवेळी त्यांच्या तोंडाला गुंगी येणारे औषध लावले. गुंगीचे औषध लावताच हे दोघेही बेशुद्ध झाले. दोघे बेशुद्ध होताच सुखदेव करे यांच्याजवळ असलेली ३५ हजाराची रोकड काढून घेतली. रोकड काढून घेतल्यानंतर चौघांनाही बेशुद्ध असलेल्या या दोघांना शेजारीच असलेल्या शेतात टाकून पलायन केले.

सायंकाळी घटनेची माहिती जत येथील सामाजिक कार्यकर्ते, १०८ गाडीवर चालक असलेले योगेश मोटे यांना मिळाली. माहिती मिळताच योगेश मोटे तेथे पोहोचले त्यावेळी सुखदेव करे हे बेशुद्ध अवस्थेत होते तर करे यांच्या सोबत असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागले होते. मोटे व १०८ गाडीतील पथकाने या दोघांना जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

रात्री उशिरपर्यंत सुखदेव करे शुद्धीत आले नव्हते. सुखदेव करे यांच्यासोबत असलेल्या शंभू खराडे यांनी चौघांनी गुंगीचे औषध लावून बेशुद्ध केले व रोकड लंपास केल्याचे सांगितले. योगेश मोटे यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. गुंगीचे औषध लावून लुटणाऱ्या या घटनेने शहरात व वाहनधारकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

Advertisement
Tags :
#CashTheft#EmergencyResponse#JatCrime#KnockoutDrug#RobberyNews#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaJat-Valsang robberymaharashtranewsSpiked with knockout drug
Next Article