महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फोंडाघाट येथे वीज कोसळून चार जनावरे दगावली

10:54 AM Nov 01, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आमदार नितेश राणे यांनी दिली घटनास्थळी भेट; प्रशासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याची दिली ग्वाही

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
विजेच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने गुरुवारी फोंडाघाट झर्येवाडी येथे वीज कोसळून महादेव सहदेव बाणे यांच्या मालकीची चार जनावरे दगावली . या जनावरामध्ये १ गाभण गाय व ३ बैल यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे श्री. बाणे कुटुंबियांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला आहे. दरम्यान फोंडाघाट दौऱ्यावर असलेल्या आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी भेट देऊन बाणे यांना प्रशासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.सदर घटनेचा तलाठी यांनी पंचनामा केला आहे. दरम्यान या दुर्घटनेमुळे महादेव सहदेव बाणे यांचे मोठे नुकसान झाले आहे. बदलत्या निसर्गचक्रामुळे परतीचा पाऊस काही कमी होत नाही. हा पाऊस केव्हाही ,अवेळी पडत असल्यामुळे भातकापणीची कामे रेंगाळली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेच. त्यातच जनावरे दगावल्यामुळे या शेतकरी कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news sindhudurg# news update # konkan update # marathi news # sindhudurg news
Next Article