Kolhapur Crime : परिते गावात लग्नाच्या धामधुमीत साडेचार तोळे दागिने लंपास
परिते येथे लग्नावेळी सोन्याच्या दागिन्यांवर धाड
कोल्हापूर :लग्नकार्याच्या धामधुमीत वर्दळीचा फायदा घेऊन चोरट्याने साडेचार तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. २ ते ६ डिसेंबर दरम्यान परीते (ता. करवीर) येथे ही घटना घडली. याबाबतची फिर्याद सविता विजय ताडे (वय २३ रा. परिते ता. करवीर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात दिली.
सवीता ताडे यांचे दिर स्वप्नील ताडे यांचा २ डिसेंबर रोजी विवाह होता. यावेळी त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची वर्दळ होती. त्यांनी लग्नात घालण्यासाठी १३ ग्रॅमचा नेकलेस, २ तोळ्याचे सोन्याचे गंठण, आणी ६ ग्रॅमचे सोन्याचे टॉप्स लॉकरमधून काढून घरातील साध्या कपाटात ठेवले होते. लग्नामध्ये हे दागिने वापरुन त्यांनी पुन्हा लॉकरमध्ये न ठेवता साध्या कपाटात ठेवले.
६ डिसेंबर रोजी सविता हे दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेल्या असता, त्यांना कपाटात नसल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र दागिने कोणाकडेच नसल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी सोमवारी सकाळी याबाबतची फिर्याद करवीर पोलीस ठाण्यात दिली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुजय दावणे करत आहेत.