For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुपारी खून प्रकरणातील आरोपींकडून साडेचार लाख जप्त

11:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुपारी खून प्रकरणातील आरोपींकडून साडेचार लाख जप्त
Advertisement

उर्वरित फरारी आरोपींचाही शोध जारी : आठ-दहा लाखांना खुनाची सुपारी : नेहरूनगर येथील एका हॉटेलजवळ ठरला व्यवहार

Advertisement

बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमधील फार्मासिस्टच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा जणांकडून सुपारीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी गुरुवारी ही माहिती दिली असून आणखी काही आरोपी फरारी झाले आहेत. त्यांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे. बसवराज भगवती (वय 50) रा. माळमारुती एक्स्टेंशन, प्रकाश राठोड (वय 41) रा. कंग्राळी खुर्द, रवी कुंबरगी (वय 28), महेश सिदराम सुंकद (वय 24), सचिन पाटील (वय 24), राम वंटमुरी (वय 28) सर्व रा. कंग्राळी बी. के. यांना बुधवारी अटक करण्यात आली होती. संशयितांनी घेतलेल्या सुपारीच्या रकमेपैकी पोलिसांनी 4 लाख 48 हजार रुपये जप्त केले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वाहतूक उत्तर विभागाचे अधिकारी व पोलिसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली असून पोलीस आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले आहे. या प्रकरणातील रामा पाटीलसह आणखी काही आरोपी फरारी आहेत.

खुनाच्या सुपारीचा व्यवहार

Advertisement

उपलब्ध माहितीनुसार आठ ते दहा लाखांना खुनाची सुपारी ठरली होती. नेहरूनगर येथील एका  हॉटेलजवळ व्यवहार ठरला होता. दि. 30 मे रोजी सकाळी विरुपाक्षप्पा कोट्य्राप्पा हर्लापूर (वय 60) रा. वनश्रीनगर, एसडीएम कॉलेज पाठीमागे, सत्तूर धारवाड या सिव्हिल हॉस्पिटलमधील चिफ डेप्युटी फार्मासिस्टच्या अंगावर कार घालून खून करण्यात आला होता. खुनासाठी वापरण्यात आलेली कार जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वाहतूक विभागाचे एसीपी पवन एन.,वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन, ए. बी. मिसे, बी. एम. देशपाईक, सतीश नाईकवाडी, एस. आर. मुनेन्नी, एन. आय. मुल्ला, आर. व्ही. रसाळकर, वाय. वाय. तळेवाडी, काशिनाथ इरगार, एस. व्ही. बडकुंद्री, एस. एस. हुडेद, बी. एस. बुकनट्टी, विवेकानंद आदींचे योगदान आहे.

Advertisement
Tags :

.