वीज खाते ‘हेल्पलाईन’साठी पर्यायी चार फोन नंबर जाहीर
11:16 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
हेल्पलाईन 1912 तात्पुरती बंद
Advertisement
पणजी : वीज बिलाचा भरणा न केल्याने वीजपुरवठा खंडित करण्याचे फसवणुकीचे संदेश अज्ञात व्यक्तींकडून प्रसारित केले जाऊ नयेत, तसेच अज्ञातांनी दिलेल्या लिंकवर कोणतेही पेमेंट करू नये किंवा कोणताही तपशील, ओटीपी शेअर करू नये असे आवाहन वीज खात्याने केले आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, तसेच त्यांना मदत हवी असल्यास जाहीर केलेला 1912 हा हेल्पलाईन क्रमांक तात्पुरता बंद करण्यात आला आहे. याबाबतची तांत्रिक समस्या व अडचणी संपुष्टात आल्यानंतर तो पुन्हा कार्यान्वित होणार आहे. मात्र जनतेसाठी पुढील पर्यायी क्रमांक जाहीर केलेले आहेत. 7559221912, 7558341913, 9049261912 आणि 7972319942 हे चार मोबाईल क्रमांक सध्या पर्यायी हेल्पलाईन क्रमांक म्हणून नमूद केले आहेत.
Advertisement
Advertisement