For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालमध्ये हिंसाचारात चार कार्यकर्त्यांचा मृत्यू

06:26 AM May 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
बंगालमध्ये हिंसाचारात  चार कार्यकर्त्यांचा मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये 4 मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हिंसाचार उसळला. गेल्या 24 तासांत भाजप आणि टीएमसीच्या दोन कार्यकर्त्यांसह चार जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री कोलकाताच्या न्यू मार्केटमधील टीएमसीच्या कार्यालयावर जमावाने बुलडोझर चालवला. दंगलखोरांनी जवळच्या दुकानांचेही नुकसान केले. दरम्यान, उत्तर 24 परगणा जिह्यातील संदेशखालीच्या बामनघेरी परिसरात गस्त घालणाऱ्या पोलीस आणि केंद्रीय दलांवर हल्ला करण्यात आला. दंगलखोरांनी केलेल्या गोळीबारात पाच सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. पक्षाचा झेंडा घेऊन आलेल्या भाजप समर्थकांच्या जमावाने कोलकाताच्या न्यू मार्केट परिसरातील दुकानांची तोडफोड केली.

मुर्शिदाबाद जिह्यातील जियागंज येथे लेनिनच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. लेनिन हे 1917 च्या रशियन क्रांतीचे नेतृत्व करणारे रशियन क्रांतिकारक नेते होते. आमताला येथे टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. भाजप समर्थकांनी दगडफेक केली आणि पोस्टर व बॅनर फाडले, असा आरोप टीएमसीने केला आहे. बामनघेरी येथील तपासादरम्यान घटनास्थळावरून बॉम्ब असलेली एक बॅग जप्त करण्यात आली. याचठिकाणी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यात आला होता. आसनसोलच्या कोर्ट मोअर परिसरात मंगळवारी रात्री उशिरा टीएमसीच्या कार्यालयाला आग लागली. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही. जगतबल्लभपूर येथील टीएमसीच्या कार्यालयालाही आग लावण्यात आली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप समर्थकांवर जाळपोळ केल्याचा आरोप केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.