Akkalkot Crime | अक्कलकोटमध्ये शेतीच्या वादातून दगड - लाकडाने मारहाण; चौघे आरोपी
05:23 PM Feb 22, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
बोरगावमध्ये दगड-लाकडाने मारहाण
Advertisement
अक्कलकोट- शेतीच्या बादातून चौघाजणांकडून दगड व लाकडाने मारहाण करण्यात आली. ही घटना देशमुख बोरगाव अक्कलकोट) येथे शुक्रवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडली.
सिध्दाराम कल्याणी मंदगी (वय ३८, रा. देशमुख बोरगाव, ता. अक्कलकोट) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यात मंदगी हे त्यांच्या राहत्या घरी असताना शेतीच्या वादातून राचप्पा हत्तरगे, सीताराम निरंजन तसेच इतर दोघेजण अशा चौघानी मिळून मंदगी यांना दगडाने तसेच लाकडाने मारहाण केली.
Advertisement
या मारहाणीत मंदगी यांच्या डोकीस जखम तसेच कमरेला व मानेला मार लागला. त्यांच्यावर अक्कलकोट येथे उपचार करुन रेफरने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Advertisement