चीनच्या दिवाळखोर कंपनीच्या संस्थापकाला जन्मठेप
07:00 AM Aug 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बीजिंग : चीननची संकटग्रस्त रियल इस्टेट कंपनी ‘एव्हरग्रांडे’चा संस्थापक हुई का यान याला आर्थिक फसवणुकीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आला आहे. याचबरोबर त्याच्या कंपन्यांवर दोन अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे. दक्षिण चीनच्या शेनजेन शहरातील न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. 2020 मध्ये एव्हरग्रांडे ही कंपनी दिवाळखोर ठरली होती. या कंपनीच्या दिवाळखोरीच्या घटनेनंतर चीनमध्ये रियल इस्टेट संकट निर्माण झाले होते जे अद्याप दूर झालेले नाही.
Advertisement
Advertisement