पश्चिम बंगालमध्ये मशिदीची पायाभरणी
तृणमूल काँग्रेसच्या निलंबित आमदाराचा पुढाकार : अनेक लोक विटा घेऊन दाखल
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिह्यातील बेलडांगा येथील तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी शनिवारी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या धर्तीवर बनवलेल्या मशिदीची पायाभरणी केली. कबीर यांनी कडक सुरक्षेत मंचावर उपस्थित असलेल्या मौलवींच्या उपस्थितीत रिबन कापून सदर समारंभ पूर्ण केला. याप्रसंगी ‘नारा-ए-तकबीर’ आणि ‘अल्लाहू अकबर’सारखे नारे देण्यात आले. कार्यक्रमासाठी दोन लाखांहून अधिक लोक जमले होते. बंगालच्या विविध जिह्यांतील लोक कार्यक्रमस्थळी दाखल होत असताना काहींनी डोक्यावर विटा घेतल्याचे तर काहींनी ट्रॅक्टर-ट्रॉली, रिक्षा किंवा व्हॅनमधूनही विटा व बांधकाम साहित्य आणले होते.
पायाभरणीचा कार्यक्रम रेजीनगरमध्ये कडक सुरक्षेत पार पडला. मशिदीच्या पायाभरणी कार्यक्रमामुळे शनिवारी सकाळपासूनच बेलडांगा आणि आसपासच्या परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. बेलडांगा आणि आसपास केंद्रीय सशस्त्र दलाच्या 19 तुकड्या, रॅपिड अॅक्शन फोर्स, सीमा सुरक्षा दलाच्या अनेक तुकड्या आणि स्थानिक पोलिसांसह 3,000 हून अधिक कर्मचारी तैनात होते. हुमायून कबीर यांनी 25 नोव्हेंबर रोजी मशिदीच्या पायाभरणी कार्यक्रमाची घोषणा केली होती. अयोध्येतील बाबरी मशिदीची वादग्रस्त रचना पाडल्याला 33 वर्षे पूर्ण होत असतानाच 6 डिसेंबर रोजी हा समारंभ होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांच्या या वादग्रस्त पवित्र्यानंतर तृणमूल काँग्रेसने 4 डिसेंबर रोजी कबीर यांना पक्षातून निलंबित केले होते.
कार्यक्रमापूर्वी हिंसाचार भडकवून कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचे कट रचले जात असल्याचा आरोप हुमायून कबीर यांनी केला होता. तसेच विरोध झाला तरीही मी बेलडांगा येथे मशिदीची पायाभरणी करेन. कोणतीही शक्ती हे बांधकाम थांबवू शकत नाही. आम्ही कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करू, असे त्यांनी म्हटले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने शुक्रवारी मशिदीच्या बांधकामाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. तसेच समारंभादरम्यान शांतता राखण्याची जबा