हिंमतीने लढली, दुखापतीमुळे 30 सेकंदात हरली
06:45 AM Aug 06, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
कुस्तीच्या नियमांनुसार, जर निशाला पराभूत करणारी कोरियाची कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचली, तर निशाला रेपेचेजमध्ये संधी मिळेल, ज्याद्वारे ती कांस्यपदकापर्यंत पोहोचू शकेल. तत्पूर्वी, निशाने पहिल्या फेरीत युक्रेनच्या कुस्तीपटूचा 6-4 असा पराभव केला. बराच वेळ सामना 4-4 असा बरोबरीत राहिला आणि अखेरच्या सेकंदात गुण मिळवून सामना जिंकला.
Advertisement
वृत्तसंस्था/ लंडन
Advertisement
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू निशा दहियाला कुस्तीच्या 68 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. महिलांच्या 68 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत ती 8-1 अशी आघाडीवर होती, परंतु तिला दुखापत झाली आणि शेवटच्या काही सेकंदात 10-8 असा पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीतील पराभवानंतरही निशाला पदकापर्यंत पोहोचण्याची संधी आहे.
Advertisement
Advertisement
Next Article