For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकाचवेळी 3 शत्रूंशी लढलो : भारतीय सैन्य

06:14 AM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
एकाचवेळी 3 शत्रूंशी लढलो   भारतीय सैन्य
Advertisement

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकला तुर्किये-चीनची साथ : हवाई सुरक्षा प्रणाली महत्त्वपूर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारत एकप्रकारे तीन शत्रूंसोबत लढत होता. पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान चीनकडून पाकिस्तानला लाइव्ह अपडेट्स देण्यात येत होते. याचबरोबर तुर्कियेने पाकिस्तानला मदत केली होती. अशाप्रकारे भारतीय सैन्य एका सीमेवर तीन शत्रूंचा सामना करत होते असे सैन्याचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी फिक्कीकडून आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.

Advertisement

संघर्षादरम्यान पाकिस्तानला चीनकडून लाइव्ह अपडेट्स देण्यात येत होते. चीन पाकिस्तानला पूर्ण मदत करत होता. आमच्याकडे सीमा एक होती, परंतु शत्रू दोन होते आणि प्रत्यक्षात शत्रू तीन होते. पाकिस्तान समोर होता आणि चीन त्याला सर्वप्रकारे मदत पोहोचवित होता. पाकिस्तानकडे जी शस्त्रास्त्रs आहेत, त्यातील 81 टक्के शस्त्रास्त्रs चीनचीच आहेत. अशाप्रकारने चीनने स्वत:च्या शस्त्रास्त्रांचे परीक्षणही अन्य शस्त्रास्त्रांसमोर केले आहे. चीनसाठी पाकिस्तान एकप्रकारे स्वत:च्या शस्त्रास्त्रांच्या परीक्षणासाठी एक लाइव्ह

लॅब ठरला. तर तुर्कियेने स्वत:च्या पद्धतीने पाकिस्तानला पूर्ण मदत केली. डीजीएमओ स्तरीय चर्चा होत असताना पाकिस्तानला पूर्ण अपडेट चीनकडून मिळत होते असे सैन्य उपप्रमुखांनी सांगितले आहे.

आमच्याकडे इस्रायलप्रमाणे आयर्न डोम नाही, त्याप्रकारची लक्झरी आमच्याकडे नाही, आमचा देश अत्यंत मोठा असून या प्रणालींकरता मोठा खर्च करावा लागतो. आम्हाला भविष्यासाठी तयारी तयारी करावी लागेल आणि भविष्यासाठी तयार रहावे लागणार असल्याचे वक्तव्य लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी केले.

पाकिस्तान आणि चीनच्या धोक्याला एकाचवेळी सामोरे जाता यावे याकरता मजबूत हवाई सुरक्षा प्रणाली असायलाच हवी. पूर्ण ऑपरेशनदरम्यान हवाई सुरक्षा कशी होती, हेच महत्त्वपूर्ण ठरले. यावेळी आमच्या नागरिकांना फारसे नुकसान झाले नाही. तरीही आम्हाला हवाई सुरक्षा प्रणालीला आणखी मजबूत करावे लागेल. भारतीय सैन्याने अत्यंत अचूकपणे पाकिस्तानात हल्ले पेले आणि दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरांनाच लक्ष्य करण्यात आले, असे उद्गार लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी म्हटले आहे.

नेतृत्वाकडून स्पष्ट संदेश

ऑपरेशन सिंदूरमुळे आम्हाला काही शिकवणही मिळाली आहे. नेतृत्वाकडून सैन्यदलांना स्पष्ट संदेश होता. आम्ही जे दु:ख सहन केले ते विसरण्याची गरज नाही, असे आम्हाला सांगण्यात आले. डाटाच्या आधारावल आम्ही लक्ष्य निश्चित केले आणि मग योजना आखून हल्ले केले. याकरता आम्ही तंत्रज्ञान आणि मानवी गुप्तचराचा वापर केला. आम्ही एकूण 21 लक्ष्यांविषयी माहिती प्राप्त केली होती आणि यातील 9 लक्ष्यांना भेदले असल्याचे राहुल सिंह यांनी सांगितले.

पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्युत्तर

22 एप्रिल रोजी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतीय सैन्याने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबविले होते. याच्या अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेतील 9 दहशतवादी अ•dयांना लक्ष्य केले होते. यामुळे बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्याने भारताच्या सैन्यतळ आणि नागरी वस्तींना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारतीय सैन्याने हाणून पाडला होता. 4 दिवसांपर्यंत चाललेल्या सैन्य संघर्षानंतर 10 मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली होती.

Advertisement
Tags :

.