महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दैव देते, कर्म नेते, पुन्हा दैव देते...

06:41 AM Feb 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दैव देते आणि कर्म नेते’ ही म्हण आपल्या परिचयाची आहे. अमेरिकेतील आयोया येथे वास्तव्य करणाऱ्या एका ख्रिश्चन धर्मगुरुला या म्हणीचे प्रत्यंतर एका वेगळ्या प्रकारे आले आहे. या धर्मगुरुचे नाव केव्हिन प्रे असे आहे. त्यांनी एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. ते खिशात ठेवून ते दुकानात काही खरेदी करण्यासाठी गेले. तेथे ते हे लॉटरीचे तिकीट विसरले. मात्र, या तिकीटाचा क्रमांक त्यांच्या लक्षात होता. तिकीट दुकानातच विसरल्याची बाबही नंतर ते विसरले.

Advertisement

मात्र, त्यांच्या सुदैवाने यांना याच तिकिटावर 4 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागला होता. त्यांनी हे वृत्त आपल्या मुलाला कळविले. मुलाने त्यांना तिकिटाचे छायाचित्र मोबाईलवर पाठविण्यास सांगितले. त्यावेळी आपण तिकीट दुकानातच विसरलो आहोत, हे त्यांना आठवले आणि त्यांनी तिकीटाची शोधशोध सुरु केली. ज्या दुकानातून खरेदी केली तेथे जाऊन त्यांनी तिकीटाची चौकशी केली. प्रथम तेथील महिला कर्मचाऱ्याने त्यांना दाद दिली नाही. तथापि, नंतर त्यांना ते तिकीट परत देण्यात आले. तोपर्यंत त्यांनी लॉटरी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवून तिकीट हरविल्याचे स्पष्ट केले होते. अखेर त्यांचे दैव बलवत्तर म्हणून विसरलेले हे बहुमूल्य तिकीटही त्यांना परत मिळाले आणि त्या तिकिटावर लागलेली रक्कमही त्यांच्या बँक खात्यावर जमा झाली. ही रक्कम खर्च न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून ती ते वृद्धापकाळाचा आधार म्हणून जपून ठेवणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article