For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलंडणारा टेम्पो सुदैवाने वाचला ...अन् मोठा अनर्थ टळला

10:11 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
कलंडणारा टेम्पो सुदैवाने वाचला    अन् मोठा अनर्थ टळला
Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील उचगाव फाट्यावरती असलेल्या गतिरोधकवर शिनोळी या भागातून आलेला बेळगावच्या दिशेने जाणारा काजूची टोलपरे भरून वाहतूक करणारा टेम्पो कलंडता कलंडता वाचला आणि मोठा अनर्थ टळला. याबाबतची अधिक माहिती अशी की, शिनोळी येथील काजू फॅक्टरीमध्ये काजूचे गर काढल्यानंतर शिल्लक राहणारी जी टोलपरे असतात त्या टोलपरांनी भरलेला टेम्पो बेळगावच्या दिशेने चालला होता. सदर टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक पोती भरल्याने टेम्पो उचगाव फाट्यावर असलेल्या गतिरोधकवर अडकला. रस्त्याचाही भाग थोडा निमूळताच असल्याने यामध्ये हा टेम्पो अडकला आणि अनेकांचे नशीब बलवत्तर म्हणून टेम्पो कलंडला कलंडता वाचला.  अन्यथा टेम्पोशेजारून ये-जा करणारे प्रवासी अडकून मोठा अनर्थही घडला असता. मात्र सदर टेम्पो कलंडण्याच्या स्थितीत तसाच राहिल्याने मोठा अनर्थ टळला. सदर टेम्पो रस्त्याच्या मध्येच असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहतुकीची मात्र कोंडी होत होती. टेम्पोमधील काजू टोलपरे पोती हळुवारपणे दुसऱ्या टेम्पोमध्ये भरून कलंडलेला टेम्पो रिकामी करण्यात आला आणि सदर टेम्पो बाहेर काढण्यात आला.

Advertisement
Advertisement
Tags :

.