For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोर्ट विलियम आता विजय दुर्ग

07:00 AM Feb 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
फोर्ट विलियम आता विजय दुर्ग
Advertisement

जॉर्ज गेटला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

Advertisement

वृत्तसंस्था/कोलकाता

कोलकाता येथील भारतीय सैन्याच्या पूर्व कमांडच्या मुख्यालयाचे नाव बदलण्यात आले आहे. आता त्याला फोर्ट विलियम नव्हे तर विजय  दुर्ग म्हटले जाणार आहे.  याचबरोबर विजय दुर्गच्या आत काही ऐतिहासिक संरचनांची नावेही बदलण्यात आली आहेत. याची पुष्टी संरक्षण मंत्रालयाच्या पूर्व कमांडचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर हिमांशु तिवारी यांनी दिली. फोर्ट विलियमचे नाव बदलून विजय दुर्ग करण्यात आले आहे. तर किचनर हाउसचे नाव बदलून माणेकशॉ हाउस करण्यात आले आहे. तर साउथ गेट ज्याला पूर्वी सेंट जॉर्ज गेट म्हटले जात होते, आता त्याचे नाव बदलून शिवाजी गेट करण्यात आले आहे. वर्तमानात विजय दुर्ग सुमारे 177 एकरमध्ये फैलावलेला आहे. हा 1757 मध्ये सिराज-उद-दौलाच्या फौजेकडून नष्ट करण्यात आलेल्या मूळ किल्ल्याची जागा घेणारा आहे.

Advertisement

ब्रिटिश शासनाने 1758 मध्ये या नव्या किल्ल्याची निर्मिती सुरू केली होती आणि याचा पहिला टप्पा 1781 मध्ये पूर्ण झाला होता. जुन्या किल्ल्याच्या पराभवातून धडा घेत इंग्रजांनी नव्या किल्ल्याला आणखी मजबूत सुरक्षा उपायांसोबत तयार केले होते. याला 8 दरवाज्यांच्या अष्टकोनीय आकारात डिझाइन करण्यात आले होते, ज्याच्या चहुबाजूला खंदक तयार करण्यात आला होता. यातील तीन दरवाजे हुगळी नदीच्या दिशेने तर अन्य दरवाजे मैदानाच्या दिशेने होते, ज्याला त्या काळात ग्लेसिस म्हटले जात होते आणि आता याला कोलकाता मैदान या नावाने ओळखले जाते.

किनचर हाउसचे नाव आता माणेकशॉ हाउस करण्यात आले आहे. 1771 मध्ये फोर्ट असॉल्ट कंपनीच्या ब्लॉकहाउसच्या स्वरुपात याची निर्मिती करण्यात आली होती.  नंतर 1784 मध्ये याला ब्रिटिश सैन्याच्या कमांडर-इन-चीफच्या निवासस्थानात बदलण्यात आले. याचे नाव ब्रिटिश फील्ड मार्शल होराशियो हर्बर्ट किचनरच्या नावावर ठेवण्यात आले हेते. आता याला फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचे नाव देण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.