For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विप्रोचे माजी सीईओ थियरी डेलापोट सर्वाधिक वेतन असलेले आयटी सीईओ

06:25 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
विप्रोचे माजी सीईओ थियरी डेलापोट सर्वाधिक वेतन असलेले आयटी सीईओ
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

विप्रोचे माजी प्रमुख थियरी डेलापोर्टे हे आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2 कोटी डॉलर (सुमारे 166 कोटी) वेतन घेणारे सलग दुसऱ्यांदा भारतीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बनले आहेत. त्यांना आर्थिक वर्ष 23 मध्ये एक कोटी डॉलर (अंदाजे रु. 83 कोटी) पगार मिळाला.

डेलापोर्टे यांनी 6 एप्रिल रोजी राजीनामा दिला असून ते 31 मे रोजी कंपनीतून बाहेर पडतील. विप्रोचे दिग्गज श्रीनिवास पलिया यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

Advertisement

यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनकडे विप्रोच्या 20-एफ फाइलिंगमध्ये असे दिसून आले की डेलापोर्टे यांना सुमारे 3.9 दशलक्षडॉलर पगार आणि भत्ते, सुमारे 5 दशलक्ष डॉलर कमिशन/व्हेरिएबल पे, ‘इतर’ वेतन म्हणून वर्गीकृत केले गेले. सुमारे 68 लाख डॉलर्स आणि दीर्घकालीन पेमेंट म्हणून 43 लाख डॉलर्स.

पलियाला सुमारे 50 कोटी रुपयांचे वार्षिक वेतन पॅकेज मिळेल, ज्यामुळे ते आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतीय आयटी उद्योगातील सर्वाधिक पगार असलेल्या सीईओपैकी एक बनतील.

Advertisement
Tags :

.