कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरियाणात भाजपला धक्का ! माजी केंद्रीय मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

06:52 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 : चौधरी विरेंद्र सिंह यांचा पक्षाला रामराम

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

हरियाणात भाजपला मोठा झटका बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री विरेंद्र सिंह यांनी सोमवारी भाजपला रामराम ठोकला होता. तर मंगळवारी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चौधरी विरेंद्र सिंह यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रेमलता सिंह यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सुमारे एक महिन्यापूर्वी चौधरी विरेंद्र सिंह यांचे पुत्र बृजेंद्र सिंह यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले होते. बृजेंद्र सिंह हे सध्या हिसारचे खासदार आहेत. 2019 मध्ये बृजेंद्र सिंह यांनी आयएएसची नोकरी सोडत राजकारणात पाऊल ठेवले होते.

विरेंद्र सिंह (78 वर्षे) हे शेतकरी नेते सर छोटू राम यांच्या घराण्याचे सदस्य असून 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात ते केंद्रीय पोलाद मंत्री होते. त्यांच्याकडे ग्रामविकास, पंचायत राज आणि पेयजल तसेच स्वच्छता विभागाचाही प्रभार होता.

घरवापसी नव्हे तर विचार वापसी

ही केवळ माझी ‘घरवापसी’ नसून ‘विचारवापसी’ देखील असल्याचे विरेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. विरेंद्र सिंह आणि प्रेमलता यांचे काँग्रेसमध्ये स्वागत पक्षाचे नेते मुकुल वासनिक यांनी हरियाणात काँग्रेस मजबूत होत राज्यात पक्षाचे सरकार स्थापन करण्यास मदत होणार असल्याचा दावा केला आहे. विरेंद्र सिंह हे माझे ज्येष्ठ बंधू असून ते पक्षात परतल्याने आनंदी असल्याचे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी केले केले आहे.

एकत्र येत वाटचाल करुया

आम्ही एकत्र येत स्वत:चे बळ वाढविण्याची गरज आहे. तरच आम्ही लोकशाही आणि राज्यघटना वाचवू शकू असेही हुड्डा यांनी म्हटले आहे. विरेंद्र सिंह यांच्या पत्नी अन् माजी आमदार प्रेमलता यांनीही भाजपला रामराम ठोकत काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. प्रेमलता या 2014-19 या कालावधीत आमदार राहिल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article