थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची मुक्तता
07:00 AM Jun 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बँकॉक : थायलंडचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांनी बुधवारी स्वत:च्या तुरुंगवासाशी निगडित सर्व कायदेशीर जबाबदाऱ्यांना औपचारिक स्वरुपात पूर्ण केले आहे. राजघराण्याकडून माफी मिळाल्यावर त्यांची शिक्षा रद्द झाली आहे. दोन दशकांहून अधिक काळापर्यंत थायलंडच्या राजकारणात प्रभावशाली व्यक्ती राहिलेले 76 वर्षीय अब्जाधीश आणि लोकप्रिय नेत्याला मागील महिन्यात बँकॉकच्या तुरुंगातून पॅरोलवर मुक्त करण्यात आले होते. थायलंडचे राजे महा वाचिरालोंगकोन याच्याकडून माफी आदेश जारी करण्यात आला असून तो बुधवारपासून लागू झाला आहे.
Advertisement
Advertisement