For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी विद्यार्थ्यांनी फेडले शाळेचे ऋण

04:04 PM May 21, 2025 IST | अनुजा कुडतरकर
माजी विद्यार्थ्यांनी फेडले शाळेचे ऋण
Advertisement

स्वखर्चातून केले दहावीच्या वर्गाचे नूतनीकरण

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
श्री देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ, सोनुर्ली संचलित माऊली माध्यमिक विद्यालय, सोनुर्ली या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत इयत्ता दहावीच्या वर्गाचे सुशोभीकरण केले. या उपक्रमांतर्गत वर्गात रंगरंगोटी, टाइल्स बसविणे व प्रोजेक्टरची सुविधा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडण्याचा उद्देश ठेवत त्यांनी एक प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. या नव्याने नुतनीकरण करण्यात आलेल्या वर्गखोलीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री. दिगंबर मोर्ये आणी मुख्याध्यापक श्री. तेरसे सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री. नागेश गावकर, संचालक व विस्तार अधिकारी श्री. लक्ष्मीदास ठाकूर, शालेय समिती अध्यक्षा सौ.आनंदी गावकर, माजी मुख्याध्यापक व सल्लागार श्री जी एस मोर्ये तसेच संस्थेचे सर्व संचालक, श्री. काकतकर सर,श्री. गंडळकर सर,श्री. सावंत सर,व शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी श्री.राजू गावकर,लिपिक श्री. नाईक,श्री.संतोष ओठवणेकर,श्री. संदीप जाधव, श्री. बापू निर्गुण हे सर्व उपस्थित होते. या उपक्रमामध्ये माजी विद्यार्थी श्री. आशीर्वाद मांजरेकर यांनी संपूर्ण माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून एकात्मता साधत उत्कृष्ट संयोजन केले. यावेळी माजी विद्यार्थी श्री. नागेश् उर्फ दादा गावडे,अविनाश गावकर, मिलिंद गावकर, शशिकांत गावकर, सचिन मिशाळ,स्वप्नाली गावकर, रूपाली गावकर,छाया गावकर,अमिता गावकर,मनीषा सोनुर्लेकर ह्या उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळेविषयीचे आपले ऋण मान्य करत हा वर्ग नव्या पिढीस समर्पित केला. तसेच माझी विद्यार्थ्यानी हया वर्षी दहावीत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्त्याचा सत्कार केला. अशा प्रकारे माजी विद्यार्थ्यांनी दिलेले हे योगदान समाजासाठी आदर्शवत ठरले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.