महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लंकेच्या समरवीरावर 20 वर्षांची बंदी

06:00 AM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेलबोर्न : लंकेचा माजी कसोटीवीर तसेच ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरीया महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक दुलीप समरवीरा यांनी शिस्तपालन नियमाचा भंग केल्याबद्दल तसेच बेशिस्त वर्तन केल्याने त्यांच्या प्रशिक्षण प्रक्रियेवर ऑस्ट्रेलियात 20 वर्षांची बंदी ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळाने जाहीर केली आहे. 2008 साली क्रिकेट व्हिक्टोरीयाने समरवीराची फलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. समरवीराने लंकेतर्फे आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 7 कसोटी आणि 5 वनडे सामने खेळले आहेत. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर 52 वर्षीय समरवीराने प्रशिक्षक क्षेत्रात प्रवेश केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे समरवीराच्या या वादग्रस्त प्रकरणाची चौकशी केली आणि त्यानंतरच त्यांच्या प्रशिक्षक प्रक्रियेवर 20 वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे आता पुढील दोन दशकांमध्ये समरवीराला ऑस्ट्रेलिया क्रिकेट क्षेत्रात कोणतेही स्थान राहणार नाही, अशी माहिती क्रिकेट व्हिक्टोरीयाचे कार्यकारी अधिकारी निक कमिन्स यांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article