For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण कोरियाच्या माजी पंतप्रधानांना कारावास

07:00 AM Jan 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण कोरियाच्या माजी पंतप्रधानांना कारावास
Advertisement

हान डुक-सू यांना 23 वर्षांची शिक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/सोल

दक्षिण कोरियाच्या न्यायालयाने माजी पंतप्रधान हान डुक-सू यांना 23 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर 2024 मध्ये माजी राष्ट्रपती यून सुक-येओल यांनी लादलेला मार्शल लॉ हा प्रत्यक्षात बंड होता, असे न्यायालयाने म्हटले आहे. डिसेंबर 2024 च्या मार्शल लॉशी संबंधित बंडखोरीप्रकरणी दोषी ठरलेले हान डुक-सू हे पहिले प्रशासकीय नेते आहेत. या निकालाचा परिणाम यून सुक-येओल आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बंडाचे आरोप असलेल्या पुढील प्रकरणांवर होण्याची अपेक्षा आहे. यून सुक-येओल यांनी हान डुक-सू यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त केले होते. मार्शल लॉ दरम्यान ते देशाचे नियंत्रण स्वीकारणाऱ्या तीन कार्यकारी नेत्यांमध्ये समाविष्ट होते. या संकटानंतर यून सुक-येओल यांना महाभियोग चालवून पदावरून काढून टाकण्यात आले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.