महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी सैनिक गजानन तेंडुलकर यांचे निधन

01:56 PM Dec 22, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Oplus_131072
Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी
येथील माजी सैनिक तथा बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी गजानन तेंडुलकर ( ७१, मूळ सावंतवाडी माठेवाडा, सध्या रा. सिंधुदुर्गनगरी) यांचे रविवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले. तेंडुलकर हे एअरफोर्समध्ये कार्यरत होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर ते बीएसएनएलमध्ये कार्यरत होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर ते सावंतवाडीत सामाजिक कार्यात सक्रिय होते. हरहुन्नरी आणि परोपकारी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. केशवसुत कट्ट्यावरील विविध उपक्रमात त्यांचा सहभाग होता. त्याशिवाय वृत्तपत्रांमधून वाचक पत्रव्यवहाराच्या माध्यमातून ते विविध सामाजिक प्रश्नावर आवाज उठवत असत. ते गेली काही वर्षे सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगी असा परिवार आहे. क्रीडा प्रशिक्षक कल्पना तेंडुलकर यांचे ते पती होत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun Bharat news update # tarun Bharat sindhudurg #
Next Article