Solapur News : माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा उद्या पंढरपूर दौरा
माजी पंतप्रधान देवेगौडा उद्या पंढरपुरात
सोलापूर : देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे गुरुवार २२ जानेवारी रोजी पंढरपुरात येत आहेत. या दिवशी ते भीमा नदीत स्नान करुन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. गुरुवारी सकाळी साठेआठ वाजता बेंगलूर विमानतळावरुन ते विशेष विमानाने सोलापूर विमातळावर दहा वाजता येणार आहेत. त्यानंतर ते मोटारीने पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. दुपारी सब्बाबारा वाजता त्यांचे पंढरपूर येथील शासकीय अतिथीगृहात आगमन होईल.
साडेबारावाजता ते भीमा नदीत स्नान करणार आहेत. त्यानंतर एक वाजता ते मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी दीड बाजता अतिथीगृहात देवगौडा है दुपारचे भोजन करणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता सोलापूरकडे मोटारीने रवाना होतील. दुपारी ३.३० वाजता सोलापूर विमानतळावरुन विशेष विमानाने ते बेंगलूरकडे रवाना होतील. माजी पंतप्रधान देवगौडा यांना झेडप्लस सुरक्ष असल्याने सुरक्षेची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आचारसंहितेच्या नियमांच्या अधिन राहून त्यांना राजशिष्टाचार देण्यात येणार आहे.