For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकचे माजी लष्करप्रमुख कमर बाजवा यांचे निधन

07:00 AM Mar 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाकचे माजी लष्करप्रमुख कमर बाजवा यांचे निधन
Advertisement

वृत्तसंस्था/इस्लामाबाद

Advertisement

पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांचे वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले आहे. ते महिनाभरापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल होते. घरातील बाथरूममध्ये घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. बाजवा यांच्या कुटुंबीयांनी इस्लामाबाद पोस्टला त्यांच्या निधनाची बातमी दिली. बाजवा यांनी 2016 ते 2022 या काळात देशाचे लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले होते. 11 फेब्रुवारी रोजी बाथरूममध्ये पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे जाहीर केले होते, परंतु त्यांच्या प्रकृतीत अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली नाही. उपचारांना योग्य साथ न मिळाल्याने त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

Advertisement
Advertisement
Tags :

.