महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी खासदार रवि वर्मा यांचा कन्येसह काँग्रेसप्रवेश

06:28 AM Nov 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लखनौ:

Advertisement

लोकसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाला रामराम ठोकणारे माजी खासदार रवि वर्मा यांनी कन्या डॉ. पूर्वी हिच्यासोबत सोमवारी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे. काँग्रेस देशात मोठे परिवर्तन घडवून आणणार असल्याचा दावा रवि वर्मा यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय आणि माजी खासदार पी.एल. पुनिया यांच्या उपस्थितीत वर्मा यांनी पक्षप्रवेश केला आहे.

Advertisement

समाजवादी पक्षात आता वैचारिक संक्रमण असल्यानेच त्या पक्षासोबतचे नाते तोडावे लागले आहे. राहुल गांधी यांच्याकडे पाहून राजकारणात महिला सुरक्षित असल्याचे आणि स्वच्छ राजकारण करता येऊ शकते असे वाटते. माझे आजोबा बालगोविंद वर्मा यांच्या नावाचा उल्लेख आजही प्रदेश काँग्रेस मुख्यालयात दिसून येत असल्याचे वर्मा यांनी म्हटले आहे.

जवळपास 25 वर्षांपर्यंत मी समाजवादी पक्षासाठी काम केले. मागील काही वर्षांपासून पक्षात नव्या लोकांचा प्रवेश झाला असला तरीही त्यांनी कधीच ग्रामीण भागांमध्ये निवडणूक व्यूहनीतिवर काम केलेले नाही. याचदरम्यान ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये संगनमत होण्यास सुरुवात झाली. सर्व जण पक्षात सामील होऊन कोट्याधीश होऊन सत्ता मिळवू पाहत होते. स्थिती बिघडू लागल्यानेच समाजवादी पक्षातून बाहेर पडत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा वर्मा यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article