महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीत काँग्रेसला मोठा झटका माजी आमदाराचा ‘आप’प्रवेश

06:31 AM Nov 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. वरिष्ठ काँग्रेस नेते आणि पाचवेळा आमादर राहिलेले मतीन अहमद यांनी रविवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी अहमद यांचे पक्षात स्वागत केले आहे.

Advertisement

उत्तर-पूर्व दिल्लीच्या सीलमपूर मतदारसंघातून 5 वेळा निवडून आलेले माजी आमदार मतीन अहमद यांच्यापूर्वी त्यांचे पुत्र जुबैर अहमद यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. यमुनापार क्षेत्रात चौधरी मतीन अहमद हे लोकांमध्ये राहून त्यांची सेवा करत आले आहेत. अहमद यांचे आम आदमी पक्षात स्वागत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

मतीन अहमद यांना दिल्लीतील दिग्गज मुस्लीम नेते म्हणून ओळखले जाते. सीलमपूर मतदारसंघात त्यांचा मोठा प्रभाव आहे. अहमद हे दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आणि दिल्ली जलबोर्डाचे उपाध्यक्ष देखील राहिले ओत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article