कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur : माजी आमदार सुरेश हाळवणकर लवकरच विधानपरिषदेवर; 'या' बड्या नेत्याचा दावा

12:52 PM Oct 21, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

इचलकरंजी : माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना पक्षाकडून लवकरच विधानपरिषदेवर संधी दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून राज्यपाल नियुक्तीच्या कोट्यात भाजपच्या तीन जागा शिल्लक आहेत. यातील पहिल्या यादीत हाळवणकर यांचे नाव असणार आहे. त्यामुळे त्यांची विधान परिषदेवरील नियुक्ती ही पहाटेच्या शपथविधीसारखी अचानक होईल. असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Advertisement

आमदार राहुल आवाडे व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष हाळवणकर यांच्या इचलकरंजीतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणून लढविणार आहेत. पण संपूर्ण महाराष्ट्रात महायुती होणार नाही. कांही ठिकाणी शहर पातळीवर तर काही ठिकाणी अगदी प्रभाग पातळीपर्यंत महायुतीबाबत तडजोडी केल्या जातील. यातून सत्ता कशी येईल, हे पाहिले जाणार आहे. पण महापौर व प्रभागाचे आरक्षण पडल्याशिवाय याबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार नाही.

Advertisement

इचलकरंजी महापालिका निवडणूक मात्र महायुतीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवाडे हाळवणकर एकत्र आल्यामुळे भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही.

यावेळी अशोक स्वामी, तानाजी पोवार, अजीतमामा जाधव, मनोज हिंगमीरे, दिलीप मुथा, युवराज माळी, जहाँगीर पटेकरी, मारुती पाथरवट, उमाकांत दाभोळे आदी उपस्थीत होते. दरम्यान, आमदार आवाडे यांच्या निवासस्थानी मंत्री पाटील यांनी भेट दिली.

यावेळी पक्ष संघटन वाढविण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली. मतदार याद्याबाबत विरोधकांकडून केवळ राजकारण केले जात असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. आमदार राहुल आवाडे व प्रकाश आवाडे यांनी स्वागत केले.

यावेळी प्रकाश दत्तवाडे उपस्थित होते. भाजपचे माजी शहराध्यक्ष धोंडीराम जावळे व पांडुरंग म्हातुकडे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्याही निवासस्थानी मंत्री पाटील यांनी भेट दिली.

Advertisement
Tags :
#kolhapur News#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediaBJP Legislative Council nominationDevendra FadnavisKolhapur politicsMaharashtra BJP leadersSuresh Halvankar
Next Article