माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंचा वाढदिवस उत्साहात
सावंतवाडी । प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री ,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीण भोसले यांचा वाढदिवस त्यांच्या महाविकास आघाडीतर्फे भोसले यांच्या सालईवाडा येथील निवासस्थानी साजरा करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भोसले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. भोसले यांच्या भगिनीचे अलिकडे निधन झाल्याने साधेपणाने हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव व्हिक्टर डान्टस ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष , इर्शाद शेख ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी नगराध्यक्ष एडवोकेट दिलीप नार्वेकर ,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी प्रसाद रेगे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,शहर महिलाध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सायली दुभाषी,काशिनाथ दुभाषी, बबन पडवळ (वेंगुर्ले),माजी आमदार राजन तेली वासुदेव नाईक,विलास सावळ(दोडामार्ग),अमोल सावंत, जिल्हा महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रेवती राणे,संदेश राणे- महिला सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश नम्रता कुबल,राजन कळगुंटकर ,मनोज वाघमोरे, म, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख मायकल डिसोझा,प्रकाश गडेकर, संजय गवस (दोडामार्ग), देविदास आडारकर अभय पंडित ,प्रवीण भोसले यांच्या पत्नी अनुराधा भोसले उपस्थित होत्या.