महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या

06:58 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिद्दीकी अजित पवार गटाचे माजी आमदार : दोन आरोपीना अटक, एकजण फरार

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

Advertisement

राज्याचे माजी राज्यमंत्री तसेच राष्ट्रवादी कँग्रेसचे (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करीत त्यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. या घटनेने  संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपासाची सुत्रे वेगवान करीत दोघांना अटक केली आहे. तर  एकजण फरार असून, त्यांचा शोध सुऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. वांद्रे येथील निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाला.

हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर चार राऊंड फायर केले. यातील एक गोळी त्यांच्या छातीत घुसली. या हल्ल्यानंतर त्यांना तत्काळ लिलावती ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचा मफत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या हल्ल्यात त्यांच्या एका सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे.

अभिनेता संजय दत्त आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील ऊग्णालयात आले होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती ऊग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली. अजित पवार यांनी त्यांचे रविवारचे सर्व कार्यक्रमदेखील रद्द केले. बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये चालले होते. त्यावेळी तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दीकींवर गोळीबार करुन तिघेही तिथून पसार झाले.

  दोघांना अटक तर चार पथके राज्याबाहेर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक आरोपी करनैल सिंह हा असून, हरियाणाचा राहणारा आहे आणि धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशातला राहणारा आहे. यांच्यासह आणखी एक हल्लेखोर होता. जो फरार आहे, त्याचे नाव शिवकुमार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आ़रोपीची चौकशी सुऊ आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी आरोपींना पैसे दिले गेले होते. तर काही दिवसांपूर्वी त्यांना डिलीव्हरी बॉयच्या माध्यमातून शस्त्र पुरवण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या हल्लेखोरांची कसून चौकशी करण्यास सुऊवात केली आहे. मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकींच्या घराची रेकी केली होती अशीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी चार पथके स्थापन करीत ते राज्या बाहेर तपासासाठी पाठविण्यात आले आहेत.

 डॉ. जलील पारकर काय म्हणाले?

‘साधारण शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास बाबा सिद्दीकींना ऊग्णालयात आणण्यात आले. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केले. आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुऊ केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशरवर जावे यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. त्यांना तशी औषधंही देण्यात आली. मात्र शनिवारी रात्री 11.25 च्या दरम्यान आम्ही त्यांना मफत घोषित केले.’ अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.

ही घटना दुदैंवी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. ही दुर्दैवी घटना आहे. मी पोलिसांबरोबर चर्चा केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा, तर दुसरा हरियाणाचा आहे. एक आरोपी फरार आहे. मुंबईत कोणत्याही परिस्थिती कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची काळजी घेण्याचे निर्देश मी पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

पंधरा विसापूर्वी आली होती धमकी

बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकी मिळाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान केली गेली. शनिवारी रात्री ते वांद्रे पूर्वचे आमदार आणि मुलगा झिशान सिद्दीकीच्या कार्यालयात जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला.

लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली

66 वर्षीय बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली आहे. ते बांधकाम व्यावसायिक होते. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ दोन मारेकऱ्यांना अटक केली. हे दोघे बिश्नोई गँगचे सदस्य असल्याचे समोर आले आहे. तत्पूर्वी पोलिसांनी विविध अंगानी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या गोळीबारामागे वैयक्तिक शत्रूत्व किंवा राजकीय कारण होते का? याचाही तपास केला जात आहे. तसेच बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात जवळचे संबंध होते, त्यामुळे बिश्नोई गँगचा या गोळीबारात सहभाग होता का? हाही तपास केला जात आहे.

कोण होते बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 व 2009 मध्ये असे सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना 2004 ते 2008 या कालावधीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी पक्षाने दिली होती. अर्थसंकल्प असो, पुरवणी मागण्या असो, की विशेष चर्चा असा मुंबईचे प्रश्न विशेषत: झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते हिरिरीने मांडत असत. 2014 च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. 2019 मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिश्यान सिद्दीकी याला मतदारसंघ बदलून वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात असत. त्या पार्ट्यांमध्ये शाहऊख खान, सलमान खान, संजय दत्त यांच्यासारखे बॉलिवूड स्टार्स जात असत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article