महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

माजी मंत्री बी. नागेंद्र यांना अटक

06:32 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महर्षि वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहाराप्रकरण : 7 तासांच्या चौकशीनंतर ईडीची कारवाई

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

महर्षि वाल्मिकी विकास निगममधील सुमारे 185 कोटी ऊपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री आणि आमदार बी. नागेंद्र यांना 7 तासांच्या चौकशीनंतर शुक्रवारी अटक केली. यानंतर अधिकाऱ्यांनी नागेंद्र यांना न्यायालयात हजर केले आणि त्यांना पुन्हा ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

सतत 40 तास तपासणी आणि अनेक लोकांची चौकशी केल्यानंतर महर्षि वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहाराप्रकरणी अधिक चौकशीसाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी माजी मंत्री बी. नागेंद्र यांना शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले होते. 10 जुलैच्या पहाटेपासून नागेंद्र यांच्या निवासासह कार्यालयावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. नागेंद्र आणि त्यांच्या कुटुंबीयांना सतत 40 तास घराबाहेर पडू न देता अधिकारी निरंतरपणे प्रश्नांचा भडिमार केला आहे.

महर्षि वाल्मिकी विकास निगममध्ये झालेल्या 185 कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे नागेंद्र यांनी सांगितले होते. मात्र, नागेंद्र यांच्या निकटवर्तीय हरिश यांच्या वक्तव्यामुळे नागेंद्रच्या वक्तव्यावर संशय निर्माण झाल्याने अधिक चौकशीसाठी त्यांना घेऊन जाण्यात आले होते.  आता प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

50 लाखांच्या गैरव्यवहाराबाबत बँक अधिकाऱ्यांची माहिती

बेंगळुरातील ईडी कार्यालयात नागेंद्र यांच्यावर अधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडिमार केला होता. नागेंद्र यांचे निकटवर्तीय हरिश देखील गुरुवारपासून ईडीच्या ताब्यात आहेत. खोटी कागदपत्रे देऊन युनियन बँकेत बेकायदेशीर खाते उघडून निगमचे कोट्यावधी ऊपये तिकडे वर्ग केल्याचे हरिशच्या जबानीत काही पुरावे सापडले आहेत. नागेंद्र यांचे सीए आणि आमदार दद्दल यांचे सीए बँकेत येऊन गेल्याचे बँकेच्या सीसीटीव्ही रेकॉर्डमध्ये दिसून आले आहे. 50 लाखांचा गैरव्यवहार झाल्याबाबत अटक करण्यात आलेल्या बँक अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पुढील तपासासाठी नागेंद्र यांना अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाची कागदपत्रे जप्त

माजी मंत्री बी. नागेंद्र आणि आमदार बसवनगौडा दद्दल यांच्या निवासांसोबतच युनियन बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले आहे. महर्षि वाल्मिकी विकास निगमचे प्रकरण असल्याने वसंतनगर येथील वाल्मिकी निगमाच्या कार्यालयावरही ईडीने छापा टाकला आहे. वाल्मिकी निगमात बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ईडीने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.

50 ते 60 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप

आरोपी सत्यनारायण यांच्याकडून वाल्मिकी निगमचे एमडी पद्मनाभ यांनी पैसे आणले होते, असे सांगितले जात आहे. त्या पैशातून नागेंद्र यांचे निकटवर्तीय हरीश यांना 25 लाख मिळाले होते. आमदार दद्दल यांचे स्वीय सहाय्यक पपण्णा यांनाही 55 लाख मिळाले होते. तपासादरम्यान हरिशने जबान दिल्याने ईडीने त्याला ताब्यात घेतले आहे. मंत्री नागेंद्र यांच्याकडून 50 ते 60 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाल्यामुळे त्यांची अधिक चौकशी केली जात आहे.

चंद्रशेखरच्या डेथनोटमध्ये मंत्र्यांचा उल्लेख

बेंगळूरच्या डॉलर्स कॉलनीतील नागेंद्र यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. नागेंद्र यांची मालमत्ता असलेल्या बीईएल रोड, मत्तीकेरे आणि मल्लेश्वरमसह बेंगळुरात चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. त्यांच्या बळ्ळारी येथील घरावरही छापा टाकण्यात आला. बेंगळूर वगळता ईडीच्या अधिकाऱ्यांनी रायचूरसह इतर जिल्ह्यांमध्येही छापे टाकले. सीबीआय या प्रकरणात हस्तक्षेप करू शकते, अशी माहिती मिळाली होती. वाल्मिकी निगममध्ये 185 कोटींचा गैरव्यवहार झाला होता. त्याची व्याप्ती कनिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पसरलेली आहे. या प्रकरणासंदर्भात आत्महत्या केलेल्या चंद्रशेखरच्या मृत्यूच्या चिठ्ठीतही मंत्र्याचा उल्लेख आहे.

प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नाही : नागेंद्र

महर्षि वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहार प्रकरणात आपली कोणतीही भूमिका नाही. आपल्या निकटवर्तीयांसह कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याची कोणतीही माहिती नाही, असा पुनऊच्चार माजी मंत्री बी. नागेंद्र यांनी केला. शुक्रवारी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक करून शांतीनगर येथील कार्यालयात चौकशीसाठी घेऊन जात असताना पत्रकारांशी संवाद साधला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article