माजी मंत्री बी. सी. नागेश यांचे निधन
06:22 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
बेंगळूर : माजी शिक्षणमंत्री बी. सी. नागेश (वय 67) यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. बेंगळूर येथील आपल्या मुलीच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बी. सी. नागेश हे गेल्या वर्षभरापासून ब्र्रेन ट्यूमरने त्रस्त होते. त्यांच्यावर दोनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी तिपटूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. बी. सी. नागेश हे तिपटूर विधानसभा मतदारसंघातून 2008 आणि 2018 मध्ये निवडून आले होते. बसवराज बोम्माई यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या निधनाने राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.
Advertisement
Advertisement