For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी नगराध्यक्षांची फसवणूक, पुण्यातील पाच जणांवर कारवाई

07:55 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
माजी नगराध्यक्षांची फसवणूक  पुण्यातील पाच जणांवर कारवाई
Advertisement

3 लाख  रुपये परत मिळविण्यात यश : राजापूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

Advertisement

प्रतिनिधी/ राजापूर

माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अॅड. जमीर खलिफे यांच्या व्हॉटसअॅपवरवर फेक लिंक पाठवून झालेल्या ऑनलाईन फसवणुकीतील तीन लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी राजापूर पोलिसांनी पुणे व परिसरातील पाच संशयित आरोपींविरोधात कारवाई केली. राजापूर पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Advertisement

मितेश जालींदर वाघुले (34, पांडुरंगवाडी महाळुंगे तर्फे निमगाव जुन्नर), किरण मच्छींद्र नेहरकर (24, येडगाव जुन्नर), विजय काशीनाथ वोऱ्हाडे (45, केळी पो. चावंड ता. जुन्नर), दत्तात्रय गंगाराम गवारी (44, सुकाळवेढे पो. आंबे ता. जुन्नर), गंधार संजय रत्नपारखी (33, रा. वाजारपेठ लक्ष्मीनारायण मंदीराच्या जवळ नारायणगांव) अशी कारवाई केलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. यातील मुख्य संशयित आपोली शादाब अन्सारी (41, चाकण तळेगाव रोड, पुणे) हा असून तो सध्या पसार आहे.

16 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी अॅड. खलिफे यांच्या मोबाईलवर आरटीओ चलन अॅपचा मेसेज आला. त्यांनी ती फाईल ओपन केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून एकूण 3 लाख रुपयांची रक्कम अज्ञात इसमाने ऑनलाईनद्वारे लांबविली. अॅड. खलिफे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ राजापूर पोलिसांत तक्रार दिली. तर ऑनलाईन फसवणूक झालेली असल्याने अॅड. खलिफे यांनी 1930 या क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार नोंदविली. याप्रकरणी राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला. तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक मोबीन शेख यांना पुणे येथे पाठविण्यात आले. तपासात पुणे येथील फिनकॉर्प कंपनीमार्फत काहींनी कर्ज घेतले होते व त्या कर्ज खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे आढळून आले.

अॅड. खलिफे यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून ऑनलाईन फसवणूक करून काढलेले तीन लाख रुपये हे मितेश जालिंदर वाघुले व किरण मच्छींद्र नेहरकर यांच्या पुणे येथील फिनकॉर्प कंपनीमार्फत घेतलेल्या कर्ज खात्यात जमा करण्यात आली होती. पोलिसांनी ही रक्कम तात्काळ अॅड. खलिफे यांच्या खात्यात वर्ग केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितिन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी .बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक मोबीन शेख, पोलीस कर्मचारी दिनेश आखाडे, दिगंबर शेलार, दीपक काळे यांनी तपासकामी परिश्रम घेत या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला.

Advertisement
Tags :

.