महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सिक्कीमचे दुसरे खासदार कालवश

07:00 AM Jun 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गंगटोक : सिक्कीमचे माजी लोकसभा सदस्य पहलवान सुब्बा यांचे निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. प्रदीर्घ प्रकृती अस्वास्थ्यानंतर त्यांचे निधन झाल्याची माहिती देण्यात आली. 1980 मध्ये त्यांनी सिक्कीम जनता पक्षाचे उमेदवार या नात्याने या राज्यातील एकमेव लोकसभा जागा जिंकली होती. ते 1984 पर्यंत खासदार राहिले. सिक्कीमचा समावेश भारतात झाल्यानंतर तेथे 1977 मध्ये प्रथम लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी काँग्रेसचे छत्रबहादूर क्षेत्री यांनी ती जिंकली होती. त्यानंतर 1980 मध्ये इंदिरा गांधी यांच्या लाटेत मात्र, सिक्कीमने सिक्कीम जनता दलाचा उमेदवार सुब्बा यांच्या रुपाने निवडून दिला होता. असा प्रकारे सुब्बा हे या राज्यातून लोकसभेवर निवडून गेलेले दुसरे खासदार होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article