कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे निधन
09:50 AM Dec 10, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बंगळुरू : माजी परराष्ट्र मंत्री, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एसएम कृष्णा यांच मंगळवारी ( 10 डिसेंबर) निधन झालं. बंगळुरू येथील निवासस्थानी मंगळवारी 2.45 च्या सुमारासा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू आणि प्रियांक खर्गे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला..एसएम कृष्णा यांनी 11 ऑक्टोबर 1999 ते 20 में 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्याव्यतिरिक्त 6 डिसेंबर 2004 ते 8 मार्च 2008 दरम्यान ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article