महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माजी फुटबॉलपटूची गळफास घेऊन आत्महत्या

12:05 PM Dec 24, 2024 IST | Radhika Patil
Former footballer commits suicide by hanging
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

कुटूंबीयांनी अन् मित्रांनी त्यांचा रविवारी रात्री मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. केक कापून त्याला कुटूंबीयाबरोबर मित्रांनी दिर्घायुष्याच्या शुभेच्या दिल्या. पण त्याच्या मनात काय सुऊ होते. हे कदाचित कोणालाच कळाले नाही. सोमवारी सकाळी त्यांने टोकाचे पाऊल उचलुन गळफास घेवून आत्महत्या केली. ही मनसुन्न करणारी घटना शहरातील पाचगाव रोडवरील एन. टी. सरनाईकनगरातील योगेश्वरी कॉलनीमध्ये घडली असून, उमेश बबन भगत (वय 38) असे त्याचे नाव आहे

Advertisement

उमेश भगत कोल्हापूरातील फुलेवाडी फुटबॉल क्लबच्या एका उत्कृष्ट खेळाडू होता. त्यांने राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब त्यांच्या घरच्याच्या निदर्शनास आली. त्यानीं त्याच्या गळ्याभोवतीचा फास सोडविला. त्याला उपचारासाठी तत्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. त्याच्या मृत्युची बातमी समजताच त्याच्या नातेवाईकासह मित्रांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. त्याच्या मृतदेह पाहून केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

केक कापून आनद उत्सव साजरा करीत, दिर्घायुष्यासाठी कुटूंबीयांनी आणि मित्रांनी शुभेच्छा दिल्या. पण त्यासर्वांना त्या शुभेच्छा काही वेळापुरत्या असेल, असा विचार कोणीही केला नसेल. सोमवारी सकाळी उमेशने गळफास घेवून आत्महत्या केली. त्याने अचानक टोकाचा निर्णय घेत आपले जीवन का संपवले. याचा उलगडा रात्री उशिरापर्यत झाला नाही. त्याने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटूंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article