For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळचे माजी अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना अटक

06:28 AM Jun 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळचे माजी अर्थमंत्री विष्णू पौडेल यांना अटक
Advertisement

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई

Advertisement

काठमांडू :

नेपाळमध्ये भ्रष्टाचार विरोधी अभियानाच्या अंतर्गत पोलिसांनी माजी अर्थमंत्री विष्णू प्रसाद पौडेल यांना अटक केली आहे. पौडेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे गंभीर आरोप आहेत. 66 वर्षीय पौडेल नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचे (यूएमएल) वरिष्ठ नेते आहेत आणि माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. पोलिसांनी पौडेल यांना पश्चिम नेपाळच्या एका हॉटेलमधून ताब्यात घेतले आहे. पौडेल यांना अटक करत काठमांडू येथे आणले गेले आहे. याप्रकरणी पुढील तपासासाठी पौडेल यांना मनी लॉन्ड्रिंग तपास विभागाच्या स्वाधीन करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. केपी शर्मा ओली यांचे सरकार मागील वर्षी जन आंदोलनानंतर कोसळले होते. यानंतर झालेल्या निवडणुकीत बालेन शाह यांचा पक्ष विजयी झाला होता.  बालेन शाह यांनी भ्रष्टाचार समाप्त करण्याचे आश्वासन प्रचारावेळी दिले होते. पद सांभाळल्यावर बालेन शाह यांनी मागील काळात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करत अनेक नेत्यांना गजाआड करविले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.