महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू डेरेक अंडरवूड कालवश

06:32 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि जागतिक दर्जाचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे सोमवारी केंट येथे वयाच्या 78 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले.

Advertisement

इंग्लंडच्या कसोटी क्रिकेट क्षेत्रामध्ये डेरेक अंडरवूड यांनी 1960 आणि 1970 च्या दशकामध्ये आपल्या जादूमय फिरकीवर अनेक मातब्बर फलंदाजांना दमविले होते. डेरेक अंडरवूड यांनी 86 कसोटीत 297 बळी मिळविले असून ते इंग्लंडचे सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले जातात. अंडरवूड यांनी आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2465 गडी बाद केले आहेत. 1977 साली झालेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यातील कसोटी मालिकेत डेरेक अंडरवूड यांनी 29 गडी बाद केले होते. अंडरवूड यांच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने ही मालिका 3-1 अशी जिंकली होती. इंग्लंड संघामध्ये त्यावेळी डेरेक अंडरवूड तसेच वेगवान गोलंदाज जॉन लिव्हर यांनी आपल्या प्रभावी कामगिरीने अनेक संघांवर वचक ठेवला होता. खेळपट्टीवर बराच उशीर राहून सेट झालेल्या फलंदाजाला बाद करण्याची शैली अंडरवूड यांच्या गोलंदाजीमध्ये पहावयास मिळाली. भारताचे लिटल मास्टर सुनिल गावस्कर यांना डेरेक अंडरवूड यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 12 वेळेला बाद केले. गावस्कर यांना पाकचे माजी कर्णधार इम्रान खान आणि विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज मायकेल  होल्डींग यांनी कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येकी 11 वेळेला बाद करण्याचा पराक्रम केला होता. दरम्यान इम्रान खान आणि होल्डींग यांचा हा विक्रम अंडरवूड यांनी मागे टाकला. कोणत्याही खेळपट्टीवर आणि कोणत्याही वातावरणात चेंडूला फिरविण्याची शैली अंडरवूड यांच्या गोलंदाजीमध्ये होती. अशी प्रतिक्रिया गावस्कर यांनी व्यक्त केली. अंडरवूड यांच्या गोलंदाजीसमोर खेळताना आपल्याला खूपच अवघड गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंडरवूड यांनी भारताविरुद्ध 20 कसोटी सामन्यात 62 गडी बाद केले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर अंडरवूड 2008 साली एमसीसीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे अंडरवूड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article