तामिळनाडूत द्रमुकच्या माजी मंत्र्याला अटक
06:43 AM Jul 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ चेन्नई
Advertisement
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या विरोधात कथितरित्या अपमानजनक आणि असभ्य टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी द्रमुकचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अनिथा आर. राधाकृष्णन यांना अटक केली. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर लगेचच ही अटकेची कारवाई करण्यात आली. राधाकृष्णन त्यांच्या मतदारसंघात गेले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अटकेच्या वेळी त्यांचे मोठ्या संख्येने समर्थक जमले होते. याप्रसंगी समर्थकांनी पोलिसांच्या कारवाईविरोधात घोषणाबाजी केली. आता त्यांच्या अटकेविरोधात राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.
Advertisement
Advertisement