Chiploon News | माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी भाजप निलंबनावर तीव्र प्रतिक्रिया, म्हणाले....
भाजपशी काडीमात्र संबंध नसतानाही निलंबनाची कारवाई
चिपळूण - आपण काही महिन्यापूर्वीच भाजपचा राजीनामा दिला असून त्यानंतर आपला पक्षाशी काडीमात्र संबंध नाही. असे असताना केवळ सुडबुध्दीने जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांनी आपल्या निलंबनाच्या कारवाईचा बाहू केला आहे. त्यामुळे यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा चिपळूणचे माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
येथे पक्षाचे काम केवळ कागदावर सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे येथे खळबळ उडाली आहे . जिल्हयातील अनेकांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्या आहेत . त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही . उत्तर रत्नागिरी सरचिटणीस मंदार कदम याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तो जेलमध्ये आहे . त्याच्यावर कारवाई न करता उलट त्याला सोडवण्यासाठी पोलीस ठाण्यात कोण गेले होते . कोणत्या वरिष्ठाचा फोन आला होता तेही जिल्हाध्यक्ष मोरे यांनी जनतेसमोर जाहीर करावे असे आव्हानही भोसले यांनी दिले .