हिंदू एकताचे माजी शहराध्यक्ष सुरेश काकडे यांचे निधन
कोल्हापूर प्रतिनिधी
प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून परिचित असलेले हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक सदस्य तथा माजी शहराध्यक्ष सुरेश बळवंत काकडे (वय 65, रा. आझाद गल्ली, गुजरी कॉर्नर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन भाऊ, चार बहिणी, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज मंगळवारी (दि.2) सकाळी 9 वाजता आहे.
ऐंशी आणि नव्वदच्या दशकात हिंदू एकताने शहरासह जिल्ह्यात जी आंदोलने केली त्यात कै. विजय कुलकर्णी, कै. शैलेश पोवार, कै. दीपक मगदूम, कै. उदय पोवार, कै. दत्ता राऊत, कै. संभाजी खराडे, कै. शिवाजीराव ससे, कै. अनिल काशीद, कै. राजू काशीद, कै. राजू पाटील यांच्यासह बाबा पार्टे, रवी घोरपडे, लालासाहेब गायकवाड, दिलीप भिवटे, हिंदूराव शेळके, आण्णा पोतदार, गजानन तोडकर, चंद्रकांत बराले, श्रीकांत पौंडकर, प्रकाश आयरेकर, दिलीप सूर्यवंशी, प्रकाश शिंदे, संभाजी शिंदे, सुजित गायकवाड (बंधू), बाबा वाघापूरकर, अंकुश वाघापूरकर, किशोर ओतारी, विठ्ठल ओतारी यांच्या बरोबरीने सुरेश काकडे यांचा सक्रिय सहभाग होता. न्यू गणेश तरुण मंडळाची स्थापना करून त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्याची परंपरा सुरू केली. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनी विविध स्पर्धांचे आयोजनही करत. शिवजयंतीचे औचित्य साधून दरवर्षी शिवमहाप्रसादाचे आयोजन करण्याची संकल्पना त्यांनी पस्तीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम राबविण्यास सुरूवात केली. पूर्वीच्या काळी गल्लीत पडद्यावर चित्रपट दाखविले जात असत. सर्व सामान्यांसाठी तसे चित्रपट दाखविण्यातही काकडे यांचा पुढाकार होता. गेले काही दिवस ते आजारी होते. रविवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना हिंदुत्ववादी नेते संभाजी उर्फ बंडा साळुंखे यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने
मुलीने धरली शिताळी
सुरेश काकडे यांना सुस्मिता आणि ऐश्वर्या दोन मुली. पत्नी सुरेखा धार्मिक कार्यात असतात. अंत्यसंस्कारावेळी मुलगी सुस्मिताने आपल्या वडिलांना निरोप देताना शिताळी धरली.
काकडे घराणे हिंदुत्ववादी विचाराचे
सुरेश काकडे आणि त्यांचा परिवार हिंदुत्ववादी विचारधारा मानणारा. बंधू मिलन आणि किरण काकडे यांच्यासह पुढची पिढीही हिंदुत्ववादी विचाराशी एकनिष्ठ आहे.