Kolhapur News : भारतीय सैन्याबाबत वक्तव्य केल्याने गडहिंग्लजमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा निषेध
गडहिंग्लजला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेचे दहन
गडहिंग्लज : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भारतीय सैन्य दल आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल अपमानकारक वक्तव्य केले आहे. यामुळे सैनिकांचे मनोबल कमी केले असून या वक्तव्याच्या विरोधात गडहिंग्लजला माजी सेनिक संघटना आणि वीरपत्नी एकत्र येत प्रतिमेचे दहन केले.
यावेळी या वक्तव्यबद्ल भारतीय सैन्य दलाची जाहीर माफी मागावी अशा आशायाचे निवेदन उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांच्याकडे दिले आहे.येथील शिवाजी महाराज यांच्या पृतळयासमोर शुक्रवारी सकाळी माजी सैनिक कुमार पाटील यांच्या नेतत्वाखाली एकत्र येत माजी मूख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निषेध केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माथेफरू माजी मूख्यमंत्री चव्हाण यांना राजकीय प्रसिध्दी मिळविण्यासाठी भारतीय सैन्यदलाबद्दल बेताल वक्तत्य केल्याच्या विरोधात राज्यातील माजी सैनिकांच्या संतापाची लाट उमटली आहे.
याचा निषेध करत त्यांनी तातडीने भारतीय सैन्य दलाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आले. अन्यथा येत्या स्थानिक स्वराज्य निवडणूकीत माजी सैनिक मतदानांवर बहिष्कार टाकणार असल्यानी इशारा यावेळी दिला. यानंतर उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन सादर केले. यावेळी संध्या जोशीलकर, वैशाली माने, यशोदा चौगुले, रामकृष्ण झैंडे, शशिकांत चौगुले, हरिबा जाधव, सुबराव पाटील निंगाप्पा मगदूम, तानाजी बिद्रेवाडी, धोंडिबा हळदकर, शिवाजीराव काकडे, जयवंत नगरे यांच्यसह अन्य उपस्थित होते,