For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीचा भीषण अपघात

05:19 PM Jan 11, 2024 IST | Kalyani Amanagi
माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या गाडीचा भीषण अपघात
Advertisement

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या गाडीचा गुरुवारी अपघात झाला. या अपघातात मेहबुबा थोडक्यात बचावल्या आहेत. तर त्यांच्या कारचा ड्रायव्हर जखमी झाला आहे.

Advertisement

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील संगम भागात हा अपघात झाला. पक्षाच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. नुकत्याच लागलेल्या आगीच्या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी मुफ्ती खानबल इथं जात असताना हा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की कारच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. सुदैवानं मुफ्ती यांना इजा झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे

Advertisement
Advertisement
Tags :

.