महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्याम रजक यांची राजदला सोडचिठ्ठी

07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/पाटणा

Advertisement

राजदचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे सरचिटणीस श्याम रजक यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. श्याम रजक यांनी राजीनामापत्रात आपली व्यथा मांडताना पक्षावर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. ‘मला बुद्धिबळाची आवड नाही, त्यामुळे माझी फसवणूक झाली’, ‘तुम्ही प्यादे खेळत होतास, मी नाते जपत होतो’, अशा काव्यात्मक शैलीत त्यांनी आपली व्यथा लिहिली. राजदला सोडचिठ्ठी दिल्ल्यानंतर ते आता जेडीयूमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. श्याम रजक यांनी लालूप्रसाद यादव यांच्या नावाने राजीनामा सादर केला आहे. अलिकडेच राजदने मनोज झा यांची राज्यसभा सदस्य म्हणून पुन्हा निवड करून त्यांना संसदेत पाठवले. त्याचवेळी धोबी समाजातील मुन्नी रजक यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. येथूनच श्याम रजक आणि राजद यांच्यात अंतर निर्माण झाले. राजदने श्याम रजक यांना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याची पूर्तता झाली नसल्याने ते नाराज होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article