खाजगी हॉस्पिटल्सच्या तपासणीसाठी समिती गठित करा
कोल्हापूर :
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत गर्भलिंग निदान कायदा आणि महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम 2021 यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सहसंचालक, आरोग्य सेवा-रुग्णालये (राज्यस्तर) मुंबई यांनी नोंदणीकृत हॉस्पिटलच्या तपासणी बाबत पत्र दिले. त्यानुसार सीईओ कार्तिकेयन एस यांच्या मागदर्शनाखाली सर्व खाजगी नोंदणीकृत हॉस्पिटलच्या तपासणीसाठी अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी दिले आहेत.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले, काही अज्ञात आजाराचा रुग्ण असल्यास किंवा अचानक साथरोग उद्भवले तर त्यावर उपचार पध्दती निश्चित नसतांना रुग्णांवर वेगवेगळया पध्दतीचे उपचार केले जातात. रुग्णांना उपचारावर मोठया प्रमाणावर खर्च होतो. अशा प्रकारांना निर्बध येण्यासाठी अज्ञात आजाराचा रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास तत्काळ स्थानिक पर्यवेक्षकीय अधिकारी यांना कळविणे अनिवार्य आहे. जि.प.च्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण क्षेत्रातील खाजगी हॉस्पिटल्सना महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम अन्वये नोंदणी करण्यात येते. नोंदीत शुश्रुषागृहांचे दर तीन वर्षानी विहीत शुल्कभरून नूतणीकरण करण्यात येते. खाजगी हॉस्पिटल नोंदणी प्रमाणपत्र असल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल करुन आंतर रुग्ण सुविधा देता येत नाही. त्याबाबतची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी (सुधारीत) अधिनियम 2021 कायद्यानुसार तपासणीसाठी स्थानिक पर्यवेक्षकीय प्रधिकारी म्हणून अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.
- 215 हॉस्पिटल्सची तपासणी पूर्ण
शुश्रुषागृह नोंदणी (सुधारीत) अधिनियम 2021 कायद्याच्या कलम 11 ब तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे, तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक, रुग्ण हक्क सनद आणि दरपत्रक या माहितीचा तपशिल दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक राहील. तसेच अनुसूचि नियम 11 ओ नुसार स्थानिक पर्यवेक्षक अधिकाऱ्यांना अवगत करावयाच्या आजारांची प्रसिध्द केली आहे. जिह्यात नोंदणीकृत हॉस्पीटलची संख्या 215 असून 31 जानेवारी 2025 अखेर एकूण 213 हॉस्पीटलची तपासणी केली आहे.
- खासगी हॉस्पिटल्सनी नोंदणी करणे बंधनकारक
तपासणीमध्ये रुग्ण हक्क संहिता, दरपत्रक, तक्रार निवारण कक्ष फलक प्रसिध्दी बाबत पाहणी करण्यात आली. 178 ठिकाणी हे फलक प्रसिध्दी केले. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन कार्यक्रम अंतर्गत प्ttज्s://प्ज्r.aंdस्.gदन्.ग्ह/ाह/ल्sाrs/त्दुग्ह या वेबसाईटवर कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी नोंदणीकृत हॉस्पिटलकडील कार्यरत सर्व डॉक्टर व नर्सिग स्टाफ यांची आणि खाजगी नोंदणीकृत हॉस्पिटल नोंदणी करणे बंधनकारक आहे. तरी सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना नोंदणी करावी, असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी केले. महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम (सुधारित) नियम 2021 अंतर्गत प्रत्येक पाच बेड साठी तीन हजार इतके शुल्क आकारणी केले जात होते. आता नवीन नियमानुसार शुल्क आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे जि. प. स्वनिधीमध्ये नोंदणीच्या माध्यमातून वाढ होत आहे.
- खासगी रुग्णालयांनी नोंदणी प्रस्ताव सादर करावेत
जिल्ह्यातील सर्व खाजगी नोंदणीकृत हॉस्पीटल्सनी महाराष्ट्र शुश्रुषागृह नोंदणी अधिनियम (सुधारित) 2021 च्या तरतुदीचे काटेकोर पालन करावे. तसेच ज्या हॉस्पीटल नोंदणीची मुदत 31 मार्च 2025 रोजी संपत आहे त्यांनी नूतणीकरण प्रस्ताव ऑनलाईन पध्दतीने तत्काळ सादर करावे, असे अवाहन डॉ. उत्तम मदने यांनी केले आहे.