For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एटीएममध्ये विसरलेली रक्कम प्रामाणिक युवकांकडून परत

09:48 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
एटीएममध्ये विसरलेली रक्कम प्रामाणिक युवकांकडून परत
Advertisement

बेळगाव : एसबीआयच्या हिंदवाडी येथील एटीएममध्ये एका व्यक्तीने विसरलेले पैसे दोघा तरुणांनी त्यांना परत केले आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशांत गुज्जर यांनी एटीएममधून काढलेले 8 हजार रुपये तेथेच विसरून गेले होते. त्याचवेळी वडगाव येथील निलेश खन्नुकर व केतन मनवाडकर हे दोघे पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले होते. या तरुणांच्या हाताला 8 हजार रुपये लागले. ही रक्कम कोणी तरी विसरून गेली असेल, या संशयाने त्यांनी त्वरित बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेऊन ही माहिती दिली. व्यवस्थापकाच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. फुटेजवरून एटीएममध्ये सापडलेले 8 हजार रुपये प्रशांत गुज्जर यांचे असल्याचे समजताच निलेश व केतन यांनी त्यांचे घर गाठले व त्यांना 8 हजार रुपये परत केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.