For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | गॅस-पेट्रोलच्या रांगा विसरा, कोल्हापुरात मटणासाठी लागली लांबच लांब रांग! 'म्हाई'चा उत्साह शिगेला

01:44 PM Apr 08, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur   गॅस पेट्रोलच्या रांगा विसरा  कोल्हापुरात मटणासाठी लागली लांबच लांब रांग   म्हाई चा उत्साह शिगेला
Advertisement

                    कोल्हापुरी हिसका! ६०० रुपये किलोने मटण मिळताच शिवाजी पेठेत उसळला जनसागर

Advertisement

कोल्हापूर - कोल्हापूर म्हटलं की रांगडी माणसं आणि इथली अस्सल खाद्यसंस्कृती डोळ्यासमोर उभी राहते. सध्या कोल्हापुरात ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा सुंदर मेळ शिवाजी पेठेत पाहायला मिळत आहे. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवार किंवा बुधवारी शिवाजी पेठेत 'म्हाई' साजरी करण्याची परंपरा गेली १९ वर्षे अखंड सुरू आहे. याच म्हाईच्या निमित्ताने आज शिवाजी पेठेत मटण खरेदीसाठी नागरिकांच्या अक्षरशः झुंबडी उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

​गॅस-पेट्रोलच्या रांगा विसरा, आता मटणासाठी रांग!

Advertisement

​कोल्हापूर शहरात यापूर्वी गॅस सिलेंडर किंवा पेट्रोल-डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. मात्र, आज शिवाजी पेठेतील चित्र काही वेगळंच होतं. या रांगा कोणत्याही जीवनावश्यक वस्तूसाठी नसून चक्क 'मटण' खरेदीसाठी होत्या. शिवाजी पेठेतील 'म्हाई' सेवाभावी मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर दर्जेदार मटणाची विक्री केली जाते.

८०० रुपयांचे मटण अवघ्या ६०० रुपयांत!

​सध्या बाजारपेठेत मटणाचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना मटण विकत घेणे कठीण झाले असताना, शिवाजी पेठेतील मंडळाने एक मदतीचा हात पुढे केला आहे. बाजारात साधारणतः ८०० रुपये किलो दराने मिळणारे मटण आज येथे अवघ्या ६०० रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्यात आले. दरातील ही मोठी सवलत आणि मटणाची उत्तम प्रत यामुळे कोल्हापूरकरांनी पहाटेपासूनच पिशव्या घेऊन रांगा लावल्या होत्या.

Advertisement
Tags :

.